HAR HINDU KA SAPNA, AKHAND BHARAT HO APNA

HAR HINDU KA SAPNA, AKHAND BHARAT HO APNA

शनिवार, ३० एप्रिल, २०१६

⛳ गुप्ता साम्राज्य ⛳

🔯 गुप्ता साम्राज्य 🔯

चंद्रगुप्त पहिला (३२०-३३५) च्या नेतृत्त्वाखाली साम्राज्याला उत्तरेत पुन्हा प्रस्थापित करण्यात आलं. चंद्रगुप्त मौर्यासारखं त्याने आधी मगध ताब्यात घेतलं. जिथे आधी मौर्य राज्याची राजधानी होती तिथेच आपली राजधानी स्थापन केली आणि याच ठिकाणापासुन उत्तर भारताच्या पूर्वेकडील राज्यांना एकत्र आणलं. याचबरोबर चंद्रगुप्तने सम्राट अशोकाच्या सरकारी सिद्धांतांनाही पुनरूज्जीवित केलं. पण त्याचा मुलगा समुद्रगुप्त याने (३३५-३७६) व नंतर नातू चंद्रगुप्त दुसरा याने (३७६-४१५) पूर्ण उत्तर आणि पश्चिम दख्खनमध्ये साम्राज्य प्रस्थापित केलं. चंद्रगुप्त दुसरा हा सर्वात महान गुप्ता राजा होता व त्याला विक्रमादित्य असंही म्हटलं जातं. तो भारताच्या सर्वात मोठ्या संस्कृतीक शतकाचा प्रशासक होता. पाटलीपुत्र, आपल्या राजधानीशी, त्याने एकीकडे व्यवबारी आणि विवेकपुर्ण युतीने आणि दुसरीकडे सेनेच्या जोरावर आपली राजकीय कारकिर्द टिकवून ठेवली. या काळतले सर्वात अप्रतिम लेख होते कालिदास. गुप्ता-कारकिर्दीत कविता ही काही विभागांपुरताच मर्यादित होती- धार्मिक व ध्यान कविता, गीत कविता, कथा- इतिहास(सर्वात लोकप्रिय धर्मनिरपेक्ष साहित्य), आण नाटक. कालिदास गीत-कविता प्रकारात पारंगत होते तरी त्यांना त्याच्या नाटकांसाठीच जास्त ओळखलं जातं. भारतीय अंक प्रणाली- ज्याचं श्रेय अनेकदा चुकून अरबांना दिलं जातं जे हे भारतातून युरोपात घेऊन गेले जिथे तिने रोमन प्रणालीची जागा घेतली. दशांश पद्धत या काळातला एक महत्त्वपूर्ण भारतीय अविष्कार आहे. इ.स.४९९ मध्ये आर्यभट्टच्या खगोलशास्त्राशी निगडीत शोधांनी सौरवर्षांची गणना, नक्षत्रीय पिंडांचे आकार व चलनांचा उल्लएक अचूक केला. चिकीत्सेत चरक आणि शुश्रुत यांनी संपूर्ण विकसित पद्धतीचा उल्लेख केला. भारतीय चिकीत्सकांनी औषधीय, सिझरीन सेक्शन, हाडांची स्थापना आणि त्वचा ग्राफ्टींगसहीत प्लास्टीक सर्जरीत नैपुण्य मिळवलंपण गु्प्ता चीनमधून आलेल्या हुन च्या हल्ल्याला बळी पडले. ४०० च्या सुरूवातीला हुन गुप्तांवर दबाव टाकु लागले. इ.स. ४८० मध्ये त्यांनी गुप्तांवर बल्ला केला आणि उत्तर भारत काबीज केला. इ.स. ५०० पर्यंत पश्चिम भारतावरही ताबा मिळवला. आणि शेवटचा गुप्ता राजा इ.स. ५५० मध्ये मुत्यू पावला. नंतरच्या दशकांमध्ये हुन स्थानिक रहिवास्यांचा भाग झाले आणि त्यांचं राज्य कमजोर झालं.

गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

🏰कुषाण साम्राज्य

मोर्य साम्राज्याच्या विभाजनानंतर इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात दक्षिण आशियात प्रादेशिक ताकदींच्या आच्छादनाचा अंतर्भाव झाला. भारताच्या असुरक्षित असलेल्या उत्तरपश्चिमी सीमांनी इ.स.पूर्व २०० ते इ.स. ३०० मध्ये अनेक आक्रमणकर्त्यांना आकर्षित केलं. हे आक्रमणकर्ते विजय आणि विल्हेवाट या बाबतीत भारतीय बनले. उत्तरपश्चिमच्या इंडो ग्रीक ने मुद्राशास्त्राच्या विकासात योगदान दिलं, त्यानंतर मध्य आशियात आलेले शकास गट भारतातच निवास करू लागले.इतर भटकणाऱ्या प्रजाती, युएज्हींनी उत्तरपश्चिम भारतातून शकासांना बाहेर हाकलवून लावलं आणि कुषाण साम्राज्याची स्थापना केली. कुषाण साम्राज्याने अफगाणिस्तान आणि ईराणच्या भागांनाही आपल्या नियंत्रणात घेतलं. भारतात त्यांचं साम्राज्य उत्तर पश्चिमेच पुरूशापुरा (आधुनिक पेशावर) पासुन सुरू होऊन पूर्वेला वाराणसी व दक्षिणेत साँची पर्यंत पसरलं होतं. काही काळासाठी त्यांचं राज्य पुर्वेला पाटलीपुत्र पर्यंतही पोहोचलं होतं. कुषाण साम्राज्य भारतीय, चिनी, पर्शियन व रोमन साम्राज्यांमध्ये व्यापाराचं प्रमुख केंद्र होतं. कनिष्का ,ज्याने इ.स. ७८ च्या दोन दशक आसपास राज्य केलं, हा सर्वात प्रभावी कुषाम राजा ठरला. त्यानेही बौद्ध धर्माचा स्विकार केला आमि काश्मिरमध्ये एका मोठ्या बौद्ध समितीची स्थापना केली. कुषाण गंधारण कलेचे उपासक होते जो ग्रीक आणि भारतीय शैली आणि संस्कृत साहित्याचा मिलाप होता. त्यांनी इ.स. ७८ मध्ये शाक कलेची सुरूवात केली जिचा २२ मार्च १९५७ मध्ये भारतात नागरिक उद्दिष्टांसाठी उपयोग होऊ लागला आणि आजही होतो आहे.

भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ

⛳मौर्य साम्राज्य

भारतीय लेखांमध्ये इ.स.पूर्व ३२६ मध्ये अलेक्झांडर द ग्रेटच्या सिंधुच्या खोऱ्यातल्या आक्रमणाबद्दल काहीच उल्लेख नाही तरी ग्रीक लेखकांनी त्या काळातल्या दक्षिण आशियात असणाऱ्या परिस्थीतीची उल्लेख नक्कीच केला आहे. पुढची अनेक वर्षे भारतीय आणि ग्रीक संस्कृतीत विशेषतः कला, निर्माण, आणि नाण्यांचा बाबतीत एक मिलाप दिसून आला आहे. उत्तर भारताच्या राजकीय समीकरणात मगधच्या उदयाचा एक व्यापक प्रभव पडला. काहीच काळानंतर चंद्रगुप्त नावाच्या राजाने मगधपासुन सुरूवात करून संपूर्ण देशावर ताबा मिळवला आणि त्यानंतर त्याने अफगाणिस्तानाकडे कुच केली. हा काळ भारताच्या सर्वात महान साम्राज्याचा, मौर्य साम्राज्याचा होता. इ.स.पूर्व ३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्तवाखाली मगध शेजारच्या राज्यांवर ताबा मिळवू लागले. चंद्रगुप्त ज्याने इ.स.पूर्व ३२४ ते ३०१ पर्यंत राज्य केलं, हा भारतावर साम्राज्य गाजवणारा सर्वात पहिला योद्धा होता. मौर्यन साम्राज्य (इ.स.पूर्व ३२६ – १८४ ) ज्याची राजधानी पाटलीपुत्र होती जी आजच्या बिहारची राजधानी पटना म्हणून ओळखली जाते. सुपीक जमिन आणि धातू संग्रह (विशेषतः लोखंड) च्या जवळ स्थित मगध हे पैसा आणि व्यापाराचं केंद्र होतं. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात ग्रीक इतिहासकार आणि मौर्य न्यायालयाचे राजदूत मेगास्थींसच्या मते त्या राजधानीत भव्य महाल, मंदिर, विश्वविद्यालय, ग्रंथालय, बागा इत्यादी होते. कथांनुसार चंद्रगुप्तचं यश हे बऱ्याचअंशी त्याच्या सल्लागार कौटिल्य, अर्थशास्त्राचे (सरकारी प्रशासन आणि शासकीय धोरणांबद्दल मार्गदर्शन करणारं एक पुस्तक) ब्राह्मण लेखकावर अवलंबुन होती. एक अत्यंत मध्यवर्ती आणि प्रतवार सरकार होतं ज्यात बरेच कर्मचारी नियुक्त होते जे नियमीत कर गोळा करायचे, पैसा आणि व्यापार, औद्योगिककला, खोदकाम, महत्त्वपूर्ण तपशील, परदेशीयांचे कल्याण, बाजार, मंदिर आणि वेश्यांसहित इतर सार्वडनिक ठिकाणांची देखभाल करायचे. एक विशाल सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा स्थापन करण्यात आली होती. राज्यांची प्रांत, जिल्हे आणि गावांमध्ये विभागणी करण्यात आली होती, ज्यांसाठी स्थानिक अधिकारी केंद्रसरकारची कामं पहात असे.अशोक बिंदूसारचा विश्वासु सुपूत्र आणि चंद्रगुप्तचा नातू होता. आपल्या वडिलांच्या राज्यात तो उज्जैन आणि ताक्लिसाचा राज्यपाल होता. त्याच्या सर्व भावांचे सिंहासनावरचे हक्क डावलून अशोकला राजा म्हणून जाहिर करण्यात आलं. त्याने इ.स.पूर्व २६९ ते २३२ पर्यंत राज्य केलं आणि तो भारताच्या अत्यंत प्रतिभाशाली राजांपैकी एक होता. अशोकच्या नेतृत्त्वाखाली मौर्यन साम्राज्याने संपूर्ण खंडावर आपली सत्ता प्रस्थापित केली. अशोकने मोर्यन साम्राज्याला दक्षिण आणि दक्षिण पूर्व सोडून पूर्ण भारतभर आपलं राज्य पसरवलं आणि मध्य आशियापर्यंतही आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. अशोकाचे शिलालेख पर्वत आणि दगडी खांबावर, त्याच्या राज्याच्या महत्त्वाच्या स्थानी – लम्पका (आधुनिक अफगाणिस्तान मधील लघमान), महास्तान (आताच्या बांग्लादेशात), आणि ब्रह्मगिरी (कर्नाटक) स्थापित केले होते. यांपैकी काही शिलालेखांनुसार आपल्या कलिंगाविरूद्ध झालेल्या युद्धात झालेल्या हिंसेमुळे चिडून अशोकने हिंसेचा त्याग केला आणि अहिंसेच्या धोरणाचा अवलंबन करण्याचा निर्णय घेतला. तो वैयक्तिक आयुष्यात जरी बौद्ध धर्म पाळत होता तरी त्याची इतर भाषा आणि धर्मांप्रती असणारी सहिष्णुता भारताच्या बहुलतावादाची वास्तविकता दर्शवायची. सुरूवातीच्या बौद्धकथांनुसार त्याने आपल्या राजधानीत एका बौद्ध समितीची स्थापना केली होती. ते पूर्ण राज्यात फिरायचे आणि त्यांनी श्रीलंकेपर्यंत आपल्या बौद्ध धर्म प्रसारकांना पाठवलं होतं. त्याच्या राज्यात मौर्यन साम्राज्याने उत्कृष्टतें शिखर गाठलं होतं आणि त्याच्या मृत्यूनंतर १०० वर्षांनी या साम्राज्याचा अंत झाला. त्याच्या राज्यात बौद्ध धर्म सिरीया, इजिप्त, मसदोनिया, मध्य आशिया आणि बर्मा पर्यंत पसरला. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्याने डोंगर आणि दगडी खांबावर लेख लिहीणं सुरू केलं जेणेकरून लोकं सहज वाचू शकतील. हे डोंगर आणि खांब आजही भारतात आहेत आणि गेली २००० वर्ष प्रेम आणि शांतीचा संदेश लोकांना देत आहे. आपल्या विचारांना त्याने धर्म असं नाव दिलं. इ.स.पूर्व २३२ मध्ये अशोकचा मृत्यू झाला. सारनाथला असलेल्या अशोकस्तंभाला भारत राष्ट्रचिन्ह म्हणून संबोधतं. अशोकस्तंभावर असलेलं ‘धर्मचक्र’ आपल्या राष्ट्रध्वजाची शोभा वाढवतं.

मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

प्राचिन भारतीय इतिहास (वैदिक काळ)


मेहरगड (भारतीय उपखंडाचा उत्तर पश्चिमीक्षेत्र ) इथून मिळालेल्या ऐतिहासिक पुराव्यांच्या मते भारतीयसंस्कृतीची सुरूवात इ.स.पूर्व ६५०० त्याआसपास झाली. हे दुनियाभरातलं त्या काळातलं सर्वात जुनं आणि शहरीस्थान आहे. इथून आपल्याला प्राण्यांना पाळणं, शेतीचा विकास आणि कला आणि शिल्प यांच्या संबंधित पुरावे सापडतात. इ.स.पूर्व ६५०० मध्ये सर्वात आधीयेथे घोडे पाळण्यात आले.  एका प्रगतिशील प्रक्रियेअंतर्गत गुरांना पाळणं, शेतीचाविकास, धातूंचा वापर आणि गावांचा आणि शहरांचा विकास या गोष्टींचाविकास झाला. काही इतिहासकारांनी सुचवलं की भारतावर इ.स.पूर्व १५००-१००० मध्ये सर्वप्रथमआर्यांनी आक्रमण केलं.पण सध्याची कोणतीच ऐतिहासिक माहिती दक्षिणआशियावर इंडो आर्यन किंवा युरोपियन आक्रमण झाले असल्याला दुजोरा देत नाही. ही लोकं मुळात आजच्या भारतीय जातिसमुहांसारखेच होते आणि तशीच भाषा बोलायचे.   

 

दोन महत्त्वाच्या शहरांचा शोधलागला - १९२० मध्येउत्खनना दरम्यान रावी नदीवर हडप्पा आणि सिंधु नदीवर मोहेंजोदडो ! या देन्ही शहरांचे अवशेष एका मोठ्या आणि संपूर्णपणे विकसीत अश्या संस्कृतीचाभाग होते जी ला इतिहासकार ‘सिंधु घाटी संस्कृती’ किंवा ‘सरस्वती संस्कृती’ असं संबोधतात.नंतर इ.स.पूर्व ३१०० ते १९००मध्ये हडप्पन संस्कृती एक विशाल शहर, क्लिष्ट संस्कृती आणि धातूकरण,कला आणि शिल्पांचा विकास आणि मोजमापनातली अचूकता दर्शवते. ते मोठ्या इमारती बांधायचे ज्या गणितावर,आकडेमोडीवर आधारीत असायच्या.त्या काळच्या शहरवसवण्याच्या पद्धतींची तुलना आजच्या आपल्या उत्तम आधुनिक शहरी इमारतींशी केली जाऊ शकते.या संस्कृतीची एक लिखीत भाषा होती जी अत्यंत उत्कृष्ट होती. यांपैकी काही शहरांचा व्यास ३ मैल इतका होता. या जुन्यानगरपालिकांमध्ये अन्नाचे भांडार, किल्ले आणि घराघरात शौचालय होते.मोहेंजोदडोमध्ये एक मैल लांब कालवा शहरांना समुद्राशी जोडायचा आणि तिथूनव्यापारी जहाज मेसोपोटामियापर्यंत जायचे. आपल्या सर्वोच्च काळातसिंधु संस्कृती सिंधु नदीच्या खोऱ्याच्या अर्ध्या दशलक्ष चौरस मैलांपर्यंत पसरली होतीआणि इजिप्त आणि सुमेरच्या संस्कृतींच्या समकालीन असुनही ती त्यांच्यापेक्षा जास्त काळटिकली. ही सरस्वती संस्कृती व्यापाराचा आणि दक्षिण आणि पश्चिमआशियामध्ये संस्कृतीचा केंद्रबिंदू होती.मेहरगढ हडप्पा, मोहेंजोदडो,कालीबंगा आणि लोथल विशाल सरस्वती संस्कृतींचे प्रमुख शहर आहे. आणि या किनाऱ्यावर अजुनही ५०० पेक्षा जास्त शहरांचं उत्खनन बाकी आहे.इ.स.पूर्व ४५०० साली मान्धात्र ने ट्रय्हुस ला हरवुनत्याला पश्चिमेत इराणातून उलथवून लावलं. इ.स.पूर्व ४००० – ३७०० हा ऋग्वेदाचा काळहोता. इ.स.पूर्व ३७३० मध्ये१० राजांचं युद्ध झालं. हा काळ सुदा आणि त्यांचे सल्लागार ऋषी वशिष्ठ आणि विश्वामित्र यांचा होता. इ.स.पूर्व ३६०० ते३१०० ही वैदिक काळाची सांगता होती जेव्हा साम, यजुर आणि अथर्व वेद लिहीले गेले. इ.स.पूर्व ३१०० हाव्यासांद्वारे महाभारत लिहीले गेल्याचा संभाव्य काळ आहे. याच काळात पृथ्वीच्या हलण्याने यमुना नदीचा,  जी सरस्वती नदीची उपनदी होती, तिचा मार्ग बदलला. यामुळे सरस्वती नदी लहान झाली. ही कलियुगाची सुरूवातहोती. इ.स.पूर्व १९००ला अजुनएकदा धरतीच्या हलण्याने सतलज नदी सरस्वती पासुन वेगळी झाली. सरस्वती कोरडीपडल्याने अनेक लोक पूर्वेला गंगाघाटाकडे निघाले ज्यामुळे भरतात अनेक संस्कृत्यांचाजन्म झाला. हडप्पन संस्कृतीनंतर इ.स.पूर्व १९००-१०००  मध्ये नैसर्गिक आणि नदीच्या परिवर्तनामुळे हडप्पनशहरांना त्यागण्यात आलं.  विकेंद्रीकरण आणिस्थलांतरं होऊनही जुन्या शेती आणि कला परंपरा आणि अनेक नविन शहरं जसे द्वारका टिकले. पारंपारिक भारताचीशास्त्रीय संस्कृती ही एक हजार वर्षांच्या काळानंतर गंगा संस्कृतीत विकसीत झाली जिनेआपल्या सरस्वतीच्या खोऱ्यातल्या आपल्या मुळांना वेदांद्वारे घट्ट धरून ठेवलं.  

 

डेविड फ्राव्ले आणि अन्य आधुनिक विद्वानांचा प्रस्ताव –

१.      इ.स.पूर्व ६५०० – ३१००, पूर्व हडप्पा, ऋग्वेदाची सुरूवात

२.      इ.स.पूर्व ३१००-१९००, परिपक्व हडप्पा, ३१००-१९००, चार वेदांचा काळ

३.      इ.स.पूर्व १९००-१०००, हडप्पा संस्कृतीची सांगता, वैदिक आणि ब्राह्मण काळाचा अंत

सोमवार, २५ एप्रिल, २०१६

स्मरण शिवछत्रपतिंचे

⛳स्मरण शिवछत्रपतींचे ⛳


शुक्लनाम श्रीनृप शालिवाहन संवत्‌ १५५१, फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी जुन्नर मावळातील शिवनेरीगडावर शिवछत्रपतींचा जन्म झाला आणि यादव साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात जो जुलुमी अंधःकार मातला होता तो या पराक्रमी महाराष्ट्रपुत्राच्या तेजाने हळूहळू दूर होऊ लागला. वास्तविक पूर्विपासूनच, महाराष्ट्र हा अतिशय संपन्न देश आहे आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्षाने महाराष्ट्राची भूमि आणखिनच पावन झाली. पण महाराजांच्या नंतर, त्यांना हवा असलेला महाराष्ट्र खरंच घडला आहे का ? आज महाराज जिथे कुठे असतील, त्यांना निदान मृत्यूनंतर सव्वातीनशे वर्षे उलटून गेल्यावरही आपले ‘मर्‍हाष्ट्रराज्या’चे, ‘हिंदवी स्वराज्याचे’ स्वप्न पूर्ण झाले आहे असे वाटत असेल का ? या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांनाच माहित आहे.. “नाही !” कारण एकंदरीतच, देशात काय, किंवा महाराष्ट्रात काय; जी काही परिस्थिती आहे ती अत्यंत भिषण आहे.
                                 आज दिवसागणिक जनजिवनातील भयानक सत्य आणखीनच भयाण होत चाललं आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, स्त्रीयांवरील वाढते अत्याचार, सामान्य जनतेची फसवणूक, निरनिराळे घोटाळे आणि त्यातला भ्रष्टाचार, धर्मांध दहशतवाद्यांचे हल्ले, दुष्काळ आणि जातियवाद ! कधीकधी मनात सहज विचार येतो, आज महाराज असते तर त्यांनी या परिस्थितीला कसं तोंड दिलं असतं ? हा प्रश्न मुळात चूकीचा आहे हे मलाही कळतंय.. कारण महाराज असते तर मुळात आजची ही परिस्थिती उद्भवलीच नसती. शिवजन्मापूर्वी आणि महाराजांच्या सुरुवातीच्या काळातही या अशा सार्‍या घटना महाराष्ट्राला भोगाव्या लागत होत्याच ! पण ‘स्वराज्य’ निर्माण झाले आणि जसजसे विस्तारू लागले तसतसे हे सारे प्रकार बंद पडत गेले. या सार्‍याबाबत आज जे पुरावे उपलब्ध आहेत त्यावरून केलेली ही मिमांसा !
                         आजच्या घडीला सर्वात भिषण प्रश्न महाराष्ट्राला भेडसावतोय तो म्हणजे दुष्काळाचा ! पाण्याच्या अभावी मुकी जनावरे तडफडून मरून पडत आहेत. अन्नदाता कृषिवल आकाशाकडे बघत बघत अखेरीस आत्महत्येचा मार्ग स्विकारतोय. अशा वेळेस आमचे मंत्रिमंडळ (सताधारी आणि विरोधीही) मात्र केवळ ‘दुष्काळी दौरे’ काढण्या शिवाय दुष्काळ पडू नये यासाठी काहीही करत नाहीत. खुद्द महाराजांच्या जन्माच्या सुमारास महाराष्ट्रात सलग दोन वर्षे भिषण दुष्काळ पडला होता. गवताची एक काडी शेतात उरली नव्हती ! आधीच दुष्काळ आणि त्यात सुलतान शेतकर्‍यांचे उरलेसुरले धान्य लुटून नेत होते. श्री समर्थ रामदास स्वामींनी,
                    
               ‘पदार्थमात्र तितुका गेला । नुसता देशची उरला ॥
जना बुडाले बुडाले । पोटेवीण गेले ॥
माणसा खावया अन्न नाही । अंथरूण पांघरुण तेही नाही ॥
भिक्षा मागता मिळेना । अवघे भिकारीच जना॥‘

             अशा शब्दात या भयंकर दुष्काळीची स्थिती वर्णन केली आहे. सुभेदार दादाजी कोंडदेव मलठणकर यांनी रायारावाने उजाड केलेल्या पुण्याच्या शेतकर्‍यांच्या कार्यात उत्साह यावा यासाठी ‘सोन्याचानांगर पांढरीवर धरीला, साहावे साली तनखा घेतला’ (संदर्भ- शिवचरित्रप्रदीप : सहा कलमी शकावली).   यानंतर, महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या-सतराव्या वर्षी स्वराज्याचा उद्योग मांडला तेव्हा या गोष्टीचा निकाल लावला. सिंहगडाच्या दक्षिणेला असणार्‍या शिवापूर आणि पुण्याच्या आग्नेयेला असणार्‍या कोंडवे नावाच्या गावालगत महाराजांनी धरणे बांधली. याचे कारण हेच की, दुष्काळ पडला तरीही शेतीच्या कामात अडथळा येता कामा नये, लोकांना पाण्याची कमतरता भासू नये. प्रत्यक्ष शिवकालीन कागदात ही दोनच धरणे बांधल्याचे उल्लेख असले तरीही महाराजांनी अशी अनेक ठिकाणी धरणे अथवा बंधारे बांधले असतील यात शंकाच नाही ! शेतकरी म्हणजे अन्नदाता. त्याचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये असा महाराजांचा कटाक्ष असे. 
               इ.स. १६७६ रोजीच्या प्रभावळीचे सुभेदार रामाजी अनंत यांना महाराजांनी लिहीलेल्या पत्रातच त्यांचे विचार स्पष्ट होतात.महाराज म्हणतात, “.. येक भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास व दुरुस वर्तणे.. रयेतीवर काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुजवरराजी नाहीत यैसे बरे समजणे.. ज्या गावात जावे तेथील कुल(ण)बी किती आहेती ते गोला करावे त्यात ज्यालाजे सेत करावया कुवत माणुसबल आसेली त्या माफीक त्यापासी बैल दाणे संच आसिला तर बरेत जाले.. (परंतू ज्याला) जोतास बैल नांगर पोटास दाणे नाही त्याविण तो आडोन निकामीजाला असेल तरी त्यालारोख पैके हाती घेऊन दो-चौ बैलाचे पैके द्यावे, बैल घेवावे व पोटास खंडी दोन खंडी दाणे द्यावे..” पाहिलं ? महाराज म्हणतात, ‘भाजीच्या एका देठावरही नजर पडू देऊ नका. रयतेचे पीक जळाले तर साहेब (महाराज) नाराज होतील. ज्या गावात जाल तेथील असतील तेवढे कुणबी गोळा करून, त्यात ज्याच्याकडे साहित्य असेल त्यांचे चांगलेच आहे पण ज्याच्याकडे नसेल त्याला शेतासाठी, दोन-चार बैलांसाठी रोख पैसे आणि पोटासाठी खंडी-दोन खंडी धान्य द्यावे ! असा राजा असताना शेतकरी आत्महत्येचा विचार तरी कसा करेल !
                     दुष्काळ आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या या सोबतच आज भेडसावणारा गंभीर प्रश्न म्हणजे स्त्रीयांची असुरक्षितता ! आज स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना पाहील्या असता महाराजांच्या त्या कठोर शासनाची प्रखरतेने उणिव भासते. स्वराज्यात अशा दोन घटना घडल्या होत्या त्या येथे नमुद करतो. खेड-शिवापूर जवळच्या रांझे गावच्या बाबाजी भिकाजी गुजर नावाच्या पाटलाने गावातल्याच एका स्त्रिवर बदअंमल केला.. बदअंमल म्हणजे बलात्कार ! महाराजांहना हे समजलं. महाराजांनी लगेच माणसं पाठवून त्या पाटलाला मुसक्या आवळून आणलं. (दि. २८ जानेवारी १६४६, संदर्भ- शिवचरित्र साहित्य खंड २, ले. २३९) गावातील प्रतिष्ठीत आणि योग्य मंडळींच्या साक्षी झाल्या आणि गुन्हा सिद्ध झाला. महाराजांनी या गुन्ह्याबद्दल जी शिक्षा दिलीय नं, ती नुसती ऐकून अंगावर काटा येतो. बाबाजी पाटलाचे कोपरापासून दोन्ही हात तोडण्यात आले आणि गुडघ्यापासून दोन्ही पायही ! पाटलाचा “चौरंगा” केला आणि त्याची पाटीलकी रद्द करण्यात आली. महाराजांच्या पत्रात तसा स्पष्ट उल्लेख आहे, “..बाबाजी बिन भिकाजी गुजर, मोकदम (पाटील),मौजे रांजे त॥ मजकूर याजपासून बदअंमल झाला. म्हणून त्याची मोकदमी अमानत (पाटीलकी) रद्द करून त्याला हातपाय तोडून दूर केले..” पाटलाला झालेल्या या कठोर शासनामूळे महाराजांच्या राज्यात आता सुलतानी सारखी बळजबरी खपवून घेतली जाणार नाही हे बाबाजी गुजरासारख्यांना समजून चूकले. यानंतर केवळ चार-पाच वर्षात अशीच अजुन एक घटना घडली. मोसेखोर्‍यातला दहा गावांचा कुलकर्णी रंगो त्रिमल वाकडे याने ‘हसाई ब्राह्मणी रांडकी’ (हंसाबाई नावाची विधवा स्त्री) हिच्यावर बदअंमल केला.पण पूर्वी महाराजांनी बाबाजी गुजराला दिलेली शिक्षा आठवून तो भितीने चंद्रराव मोर्‍यांच्या आश्रयाला जाऊन दडून बसला. महाराजांना ही गोष्ट समजताच ते त्याला माणसे पाठवणार इतक्यात समजले की रंगोबा भितीनेच हाय खाऊन मेला. महाराजांच्या ११ डिसेंबर १६५२ च्या मोसेखोर्‍याच्या देशमुख-देशपांड्यांना लिहीलेल्या पत्रात याचे उल्लेख आहेत. महाराज म्हणतात, “..रंगोबा मजकूर देहाये मजकुरीची गाव कुलकर्ण्य चालवित होता यावरी हसाई ब्राह्मणी रांडकी त॥ मजकुरी होती तीसी त्याणे सिंदलकीचा अंमल केला. ते खबर जाहिराना होऊन दिवाणात खबर जाली यावरी त्याची दिवाणे दस्त करावे तो इतकीयावरी रंगोवा मजकूर अगोधरच पलाला तो जाऊन चंदररायाच्या आश्रियाने तेथेच राहीला. यावर तो तेथेच देवकरणीने मयेत जाला..” (संदर्भ- शिवचरित्र साहित्य खंड ७, ले. ३७) यानंतर मात्र महाराजांच्या राज्यात बलात्काराच्या घटनांची विश्वासार्ह अशी एकही नोंद सापडत नाही.
               भ्रष्टाचार तर महाराजांच्या राज्यात खपतच नसे. २२ सप्टेंबर १६७८ रोजीच्या पत्रातील एका साध्या नोंदीचे उदाहरण पहा. सांगली जिल्ह्यातील खटाव प्रांताचा सुभेदार व्यंकाजी रुद्र याने गोंदवले प्रांतातील काही देवस्थानांच्या वेलापूर इनामातील ५ होन घेतले. या प्रकाराबद्दल महाराजांनी त्याला कशा प्रकारे ताकीद दिली पहा- “..सांप्रत वेलापूरच्या इनामापैकी कारकुनानी होन ५ घेतले आहेत म्हणून कलो आले. तरी हे कोणे शहाणपण ?  देवाच्या इनामास उपद्रव देऊन  पैके घ्यावया गरज काये होती. याउपरी ताकीद जाणून वेलापूरचे इनामापैकी पाच होन घेतले आहेत ते परतोन देणे व पुढे अवघियाही इनामास काडीची तसवीस न देणे..” महाराजांची आपल्या अधिकार्‍यांना दिलेली अशी अनेक ताकीदपत्रे आज उपलब्ध आहेत. जंजिर्‍याच्या कामावर असलेल्या दौलतखान आणि मायनाक भंडारीयांना वेळेवर रसद पोहोचती केली नाही या कारणास्तव महाराजांनी प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला “ब्राह्मण म्हणौन मुलाहिजा कोण धरू पाहतो” अशा ताकदीचे दि. १९ जानेवारी १६७५ रोजीचे पत्र तर प्रसिद्धच आहे. यानंतर महाराजांनी जिवाजी विनायकाला कामातील कुचराई बद्दल बडतर्फच केले.
        सध्यासारखे धर्मांध दहशतवादी सुलतानांच्या रुपात त्याकाळीही होतेच की ! पण महाराजांनी अशा ‘शुंभ-निशुंभांचा’ वेळोवेळी कसा निकाल लावला ते अफजलखान, खवासखान, शायिस्ताखान इत्यादी प्रकरणावरून आपल्याला माहित आहेच. या सार्‍या गोष्टींचा विचार केला असता, आज महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं ते आपल्याला सहज समजू शकतं. दुर्दैवाने, उठता-बसता सतत शिवाजी महाराजांचं नाव घेणारे राजकारणी आणि त्यांना छुपा पाठींबा देणार्‍या तथाकथीत शिवप्रेमी जातियवादी संघटना यांना ‘शिवाजी’ या तीन अक्षरातलं देवपण.. नव्हे नव्हे, या तीन अक्षरातलं ‘माणूस’पण कधीच समजलं नाही. म्हणूनच, आजही आमचं स्वतंत्र राज्य, स्वराज्य असतानाही आमच्याकडे शेतकर्‍याला आत्महत्या करावी लागते. आमच्या आया-बहिणींना भितीच्या छायेत वावरावं लागतं. आमच्या जनतेला कराच्या नावाखाली जणू छुपी खंडणीच भरावी लागते. बाकीची साधनं कमी पडली की काय म्हणून आज ‘पाण्या’च्या बाबतीतही भ्रष्टाचार केला जातो... आज अरबी समुद्रात अब्जावधी रुपये खर्चून महाराजांचं भव्य स्मारक उभारण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. पण खरंच, आज विचार केला तर काय वाटतं ? आपले गडकिल्ले असे दुर्लक्षित असताना, गावागावात मुलभूत गोष्टींचा अभाव असताना, प्रजा दुष्काळाला आणि महागाईला कंटाळली असताना या सार्‍याकडे दुर्लक्ष करून निव्वळ आपला पुतळा बसवणं महाराजांना खरंच आवडेल ? आयुष्यात, आपलं नाव एखाद्या किल्ल्यावर एखाद्याही शिलालेखात लिहू न देणार्‍या, किंबहूना कालगणनेलाही आपलं नाव न देता ‘राज्याभिषेक शक’ करणार्‍या या जाणत्या राजाला हे अब्जावधी रुपये असे निर्लज्जपणे ‘पाण्यात’ घातलेले खरंच आवडतील का ? या सगळ्या गोष्टींचा आपणच विचार करावा... याबाबतीत समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं केलेलं सार्थ वर्णन आठवल्याशिवाय राहवत नाही-

                        यशवंत, कीर्तिवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतिवंत । जाणता राजा ॥ 
आचारशीळ, विचारशीळ । दानशीळ, धर्मशीळ
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळांठायी ॥

अधिक काय लिहावे ? अखेरीस या युगपुरुषाचा प्रतिहारींप्रमाणे एकच जयघोष करतो.. “प्रौढप्रतापपुरंदर, सेनाधुरंधर, क्षत्रियकुलावतंस, गो-ब्राह्मणप्रतिपालक महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की ऽऽऽ जय ! जय !! जय !!! ”