HAR HINDU KA SAPNA, AKHAND BHARAT HO APNA

HAR HINDU KA SAPNA, AKHAND BHARAT HO APNA

गुरुवार, १० मे, २०१८

🔅 सुसंस्कार विसरलेली आजची तरुण पिढी !

सुसंस्कार विसरलेली आजची तरुण पिढी !

May 10, 2018

१. आजच्या पिढीची विदारक स्थिती

‘काही दिवसांपूर्वी आम्ही देवाज्ञा झालेल्या एका संतांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. आम्ही सर्वजण त्यांच्या घरी बोलत असतांना त्या संतांची २३ – २४ वर्षांची नात बाहेरून आली आणि आमच्या समोरून सरळ आत गेली. आत जातांना तिने ‘आपल्या घरात कुणी पाहुणे किंवा संत मंडळी आली आहेत’, असे काहीही पाहिले नाही. ती सरळ आत जाऊन गप्पा मारत बसली. हे सहज वाटणारे दृश्य आजच्या पिढीची विदारक स्थिती दाखवून गेले. एका थोर संतांच्या घरची अशी स्थिती आहे, तर बाहेर काय स्थिती असेल ? याचा अंदाजही लावणे कठीण आहे.

२. हिंदु संस्कृतीने ‘अतिथी देवो भव ।’असे सांगणे आणि आजच्या पिढीला याचा विसर पडणे

हे दृश्य पाहिल्यावर मनात विचार आले, ‘अतिथी देवो भव ।’, म्हणजे ‘घरी आलेला अतिथी देवासमान आहे’, हे सांगणारी आपली हिंदु संस्कृती आहे. त्याचे आचरण करत पूर्वी घरातील लक्ष्मीस्वरूप स्त्रिया आणि मुली घरात आलेल्यांचा आदराने पाहुणचार करत. त्यांना नमस्कार करत; पण आजची तरुण पिढी बाहेरचे लोक तर दूरच, घरातल्यांशी वागण्याचे संस्कारही विसरून गेली आहे. ‘घरी आलेल्या अतिथीचे आदरातिथ्य करणे’, हे तर साधे आणि सामान्य कौटुंबिक संस्कार आहेत. तेच आजची पिढी विसरली आहे. असे असतांना संत-महात्म्यांची शिकवण त्यांच्या कशी लक्षात रहाणार ? आजच्या तरुण पिढीची याहून अधोगती ती काय असेल ?’

३. आजच्या तरुण पिढीच्या अधोगतीला उत्तरदायी कोण ?

या स्थितीला जितकी आजची मुले उत्तरदायी आहेत, त्यापेक्षा अनेक पटींनी त्यांचे पालक (आई-वडील) उत्तरदायी आहेत. आपल्या मुलांना योग्य वेळी योग्य वळण लावणे आणि त्यांच्यावर योग्य संस्कार करणे, हे आई-वडिलांचे (पालकांचे) कर्तव्य आहे. वेळ पडल्यास मुलांशी कठोर वागून त्यांना शिक्षा करून घडवणे, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

४. साधकांना समाजाला धर्माचरणाचे महत्त्व पटवून देऊन ते शिकवण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागणार असणे

हे केवळ एक उदाहरण आहे. यावरून ‘कुटुंब जपणारे साधे संस्कारही आजच्या पिढीला ठाऊक नाहीत’, हे लक्षात येते. यावरून ‘समाजाला धर्माचरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि ते शिकवण्यासाठी आपल्याला (साधकांना) किती कठोर प्रयत्न करावे लागतील’, हे लक्षात येते.’

– श्री. दिवाकर आगावणे

रविवार, १५ एप्रिल, २०१८

🚩 हिंदूंनो, आजच ग्रंथ खरेदी करा ! – मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात

हिंदूंनो, आजच ग्रंथ खरेदी करा ! – मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात

April 15, 2018

मालेगाव येथे २००६ आणि २००८ मध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथक, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि तत्कालीन काँग्रेस शासन यांनी केवळ ‘भगवा दहशतवाद’ अस्तित्वात आहे, हे सिद्ध करण्यासाठी या बाँबस्फोटांशी दुरान्वयानेही संबंध नसणार्‍या निष्पाप हिंदूंना पकडले. तेच आरोपी आहेत, हे सिद्ध करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाने एक अत्यंत भयावह कुभांड रचून त्यांचा अनन्वित छळ केला. सत्तेसाठी शासन किती नीच स्तराला जाऊ शकते, हे वरून सिद्ध झालेे.

ते कसे, हे जाणण्यासाठी वाचा…

१. साध्वी प्रज्ञासिंग यांना आरोपी ठरवण्यासाठी रचलेली कपोलकल्पित कहाणी

२. निष्पाप सुधाकर चतुर्वेदी यांच्या छळाची क्रूर कहाणी

३. बेपत्ता दिलीप पाटीदार यांचे न उकलणारे गूढ

४. कर्नल पुरोहित यांच्यावरील आरोपांचा फज्जा

५. प्रसारमाध्यमांचे अपयश… आणि बरेच काही…

श्री. विक्रम भावे यांनी या आरोपींशी प्रत्यक्षात बोलून आणि माहितीच्या अधिकाराखाली त्या संदर्भातील माहिती मिळवून सत्य घटनांचा उलगडलेला हा आलेख बाँबस्फोटांमागील अदृश्य हात अधोरेखित करतो…

🚩 यासाठी प्रत्येक धर्माभिमानी हिंदूने वाचावाच असा ग्रंथ !

📑 सवलतीच्या दरात विक्री मूल्य : रु. ६०/-मराठी आणि हिंदी भाषेत उपलब्ध

☎ ग्रंथ मिळण्यासाठी संपर्क : ९३२२३१५३१७

💻 संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध : www.sanatanshop.com

शुक्रवार, ३० मार्च, २०१८

हनुमान जयंती का क्या है महत्त्व ?

हनुमान जयंती का क्या है महत्त्व ?

#HanumanJayanti #LordHanuman

हनुमानजी का जन्म त्रेतायुग में चैत्र पूर्णिमा की पावन तिथि पर हुआ। तबसे हनुमान जयंती का उत्सव मनाया जाता है। इस दिन हनुमानजी का तत्त्व अन्य दिनों की तुलना में १ सहस्र गुना अधिक कार्यरत होता है। इस दिन हनुमानजी की उपासना करनेवाले भक्तों को हनुमानजी के तत्त्व का अधिक लाभ होता है।

हनुमानजी की उपासना के विषय में जानिए -
https://www.hindujagruti.org/hindi/s/252.html

🚩 १८५७ के स्वतंत्रता संग्राम की पहली चिंगारी क्रांतिकारी मंगल पांडे

🚩🚩🚩
१८५७ के स्वतंत्रता संग्राम की पहली चिंगारी क्रांतिकारी मंगल पांडे इनके बलिदानदिन (तिथीनुसार) पर शत् शत् नमन !
🙏🙏🙏

👉 जानिए उनका इतिहास - https://www.hindujagruti.org/hindi/h/70.html

🚩🚩🚩 To establish Hindu Rashtra, join @ Hindujagruti.org/join

मंगळवार, २७ मार्च, २०१८

🚩🙏श्रेष्ठवीर आणि स्वामीसेवातत्पर हनुमान !

श्रेष्ठवीर आणि स्वामीसेवातत्पर हनुमान !

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजही एका अभंगात हनुमंताला विनवणी करून म्हणतात,
‘शरण शरण जी हनुमंता ।
तुज आलों रामदूता ।
काय भक्तीच्या त्या वाटा ।
मज दावाव्या सुभटा ।।
(तुकाराम गाथा, अभंग ३२८३, ओवी १, २)

भावार्थ : ‘अहो मारुतिराया, तुम्ही रामाचे सेवक आहात; म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. (असे द्विवार सांगतात.) अहो श्रेष्ठवीरा, भक्तीच्या वाटा कोणत्या आहेत, त्या मला दाखवाव्यात.’ ‘सुभटा’, म्हणजे ‘चांगल्या योद्ध्या’, असे म्हणून त्यांना हनुमंताला सन्मानिले आहे.

अधिक माहितीसाठी : https://www.sanatan.org/mr/a/891.html

सहभागी व्हा : Sanatan.org/sampark

सोमवार, २६ मार्च, २०१८

🙏 वास्तूशुद्धीसाठी उपयुक्त नामजप कुठला ?

वास्तूशुद्धीसाठी उपयुक्त नामजप कुठला ?

वास्तूदोष घालवण्यासाठी वास्तूशांती, उदकशांती यांसारख्या उपाययोजना करतात. बर्‍याचदा वास्तूत रहाणार्‍या व्यक्तींचे स्वभावदोष, वास्तूच्या वापराचे कारण, वास्तूवर होणारा वाईट शक्तींचा परिणाम आदी कारणांमुळे वास्तूत त्रासदायक स्पंदने निर्माण होत रहाण्याची शक्यता असते. अशा त्रासदायक वास्तूत रहात असल्यास वास्तूतील अयोग्य स्पंदनांचा त्याच्या जीवनावर तसेच साधनेवर परिणाम होतो. वास्तू नेहमी चांगल्या स्पंदनांनी भारित रहावी आणि साधनेला पूरक व्हावी, यांसाठी ती स्वच्छ ठेवणे, वास्तूत नियमित तीर्थ किंवा गोमूत्र शिंपडणे यांच्या जोडीलाच वास्तूत नियमित नामजप करणे आवश्यक असते. नामजपातील शक्तीमुळे वातावरण शुद्ध होत असल्याने वास्तूदोष दूर होण्यास लवकर साहाय्य होते.

अधिक माहितीसाठी : https://www.sanatan.org/mr/a/972.html

सहभागी व्हा : Sanatan.org/sampark

Like Page : (Y) https://www.facebook.com/sanatansanstha/

शुक्रवार, १६ मार्च, २०१८

⛳गुढीपाडवा विशेष

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा ! , https://sanatanprabhat.org/marathi/135201.html