HAR HINDU KA SAPNA, AKHAND BHARAT HO APNA

HAR HINDU KA SAPNA, AKHAND BHARAT HO APNA

गुरुवार, १० मे, २०१८

🔅 सुसंस्कार विसरलेली आजची तरुण पिढी !

सुसंस्कार विसरलेली आजची तरुण पिढी !

May 10, 2018

१. आजच्या पिढीची विदारक स्थिती

‘काही दिवसांपूर्वी आम्ही देवाज्ञा झालेल्या एका संतांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. आम्ही सर्वजण त्यांच्या घरी बोलत असतांना त्या संतांची २३ – २४ वर्षांची नात बाहेरून आली आणि आमच्या समोरून सरळ आत गेली. आत जातांना तिने ‘आपल्या घरात कुणी पाहुणे किंवा संत मंडळी आली आहेत’, असे काहीही पाहिले नाही. ती सरळ आत जाऊन गप्पा मारत बसली. हे सहज वाटणारे दृश्य आजच्या पिढीची विदारक स्थिती दाखवून गेले. एका थोर संतांच्या घरची अशी स्थिती आहे, तर बाहेर काय स्थिती असेल ? याचा अंदाजही लावणे कठीण आहे.

२. हिंदु संस्कृतीने ‘अतिथी देवो भव ।’असे सांगणे आणि आजच्या पिढीला याचा विसर पडणे

हे दृश्य पाहिल्यावर मनात विचार आले, ‘अतिथी देवो भव ।’, म्हणजे ‘घरी आलेला अतिथी देवासमान आहे’, हे सांगणारी आपली हिंदु संस्कृती आहे. त्याचे आचरण करत पूर्वी घरातील लक्ष्मीस्वरूप स्त्रिया आणि मुली घरात आलेल्यांचा आदराने पाहुणचार करत. त्यांना नमस्कार करत; पण आजची तरुण पिढी बाहेरचे लोक तर दूरच, घरातल्यांशी वागण्याचे संस्कारही विसरून गेली आहे. ‘घरी आलेल्या अतिथीचे आदरातिथ्य करणे’, हे तर साधे आणि सामान्य कौटुंबिक संस्कार आहेत. तेच आजची पिढी विसरली आहे. असे असतांना संत-महात्म्यांची शिकवण त्यांच्या कशी लक्षात रहाणार ? आजच्या तरुण पिढीची याहून अधोगती ती काय असेल ?’

३. आजच्या तरुण पिढीच्या अधोगतीला उत्तरदायी कोण ?

या स्थितीला जितकी आजची मुले उत्तरदायी आहेत, त्यापेक्षा अनेक पटींनी त्यांचे पालक (आई-वडील) उत्तरदायी आहेत. आपल्या मुलांना योग्य वेळी योग्य वळण लावणे आणि त्यांच्यावर योग्य संस्कार करणे, हे आई-वडिलांचे (पालकांचे) कर्तव्य आहे. वेळ पडल्यास मुलांशी कठोर वागून त्यांना शिक्षा करून घडवणे, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

४. साधकांना समाजाला धर्माचरणाचे महत्त्व पटवून देऊन ते शिकवण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागणार असणे

हे केवळ एक उदाहरण आहे. यावरून ‘कुटुंब जपणारे साधे संस्कारही आजच्या पिढीला ठाऊक नाहीत’, हे लक्षात येते. यावरून ‘समाजाला धर्माचरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि ते शिकवण्यासाठी आपल्याला (साधकांना) किती कठोर प्रयत्न करावे लागतील’, हे लक्षात येते.’

– श्री. दिवाकर आगावणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा