भारताचा उत्तर आणि पश्चिमी भाग यानंतर इतर राज्यकर्त्यांच्या ताब्यातून मुक्त झाला. शेवटी त्यातल्या थानेसरच्या एका राजाने, पुशाभुक्ती परिवाराचा राजा प्रभाकर वर्धन, याने सर्व आक्रमणकर्त्यांना ताब्यात घेतलं. प्रभाकर वर्धन या साम्राज्याचे पहिले राजा होते आणि त्यांची राजधानी सध्याच्या हरियाणा कुरूक्षेत्रा जवळच्या थानेसर या छोट्या शहरात स्थापन करण्यातआली होती. इ.स. ६०६ मध्ये प्रभाकराच्या निधनानंतर त्याचा मोठा मुलगा राज्यवर्धनयाने कन्नौजचं राज्य सांभाळलं. मालवा राजा देविगुप्ता व गौडा राजा ससांक यांच्याशी युद्धादरम्यान राज्यवर्धनचा मृत्यू झाला. त्यामुळे १६ वर्षांचा असतानाच हर्षवर्धनला गादी सांभाळावीलागली.लवकरच हर्षांने एका भारतीय साम्राज्याची स्थापना केली. इ.स. ६०५ ते ६४७ पर्यंतत्याने उत्तर भारतातल्या एका साम्राज्यावर राज्य केलं. हर्षा बहुतेक भारतीय इतिहासातला सर्वोत्तम राज्यकर्ता होता आणि आपल्या पूर्वजांपेक्षा वेगळा, एक प्रभावशाली प्रशासकही होता. तो कलेचाही चाहताहोता. त्याची राजधानी कन्नौज गंगा नदीच्या किनाऱ्यावर ४-५ मैल पसरली होती आणि तिथेमोठमोठ्या इमारतीही होत्या. त्याने गोळा केलेल्या करांमधला फक्त चौथा वाटा सरकारी कामकाजात वापरला जायचा. बाकीचे वाटे दान, पुरस्कार आणि विशेषतः संस्कृती- कला, साहित्य, संगीत आणि धर्माच्या विकासासाठी उपयोगात आणला जायचा.या काळातलं सर्वात महत्त्वपूर्ण यश हे धर्म, शिक्षण,गणित, कला आणि संस्कृतसाहित्य आणि नाटक या क्षेत्रात होत. तो घर्म जो नंतर आधुनिक हिंदुत्त्वात विकसीत झाला, तो आपल्या घटकांतअचूक असण्याचा पुरावा होता. मुख्य ईश्वर, प्रतिमापूजन, भक्ती (श्रद्धा ) आणि मंदिराचं महत्त्व. शिक्षणात व्याकरण, रचना. तर्क, कारणमिमांसा, गणित, चिकीत्सा, आणि खगोल विज्ञानाचा समावेश होता. हे सगळेच विषयउत्कृष्टतेच्या उच्च स्तरावर पोहोचले.अतिव्यापारमुळे भारतीय संस्कृती बंगालच्या खाडीच्या आसपासची प्रमुख संस्कृती बनली. या संस्कृतीचा बर्मा, कंबोडिया आणि श्रीलंकीय संस्कृतीवर ही प्रभाव पडला. अनेक अर्थांनी गुप्ता साम्राज्याच्या नंतरचा काळ‘महान भारता’चा काळ होता ज्यात भारत आणि त्याच्याशेजारी राष्ट्रांच्या संस्कृतीक किर्याकलापांनी भारतीय संस्कृतीचा मुलाधार स्थापन केलागेला. हर्षवर्धनच्या मृत्यूनंतर कन्नौज राज्याचा इतिहास इ.स. ७३० पर्यंत अनिश्चित होता, पणइ.स. ७५२ पर्यंत येशोवेर्मनने तिथे राज्यकेलं. यानंतर आयुध साम्राज्य आलं. यात तिनराजे होऊन गेले.पहिलायजयुधा जे इ.स ७७०पर्यंत राज्य करत होता. आयुध नंतर पर्थिहरा राजा दुसरा नागाभट्ट याने कन्नौजवर तीबा मिळवला. हर्षवर्धन नंतर उत्तर आणि उत्तरपश्चिम भागावर प्रतिहार राज्याचं राज्य आलं आणि मध्य आणि दक्षिम भारतात राष्ट्रकुट साम्राज्य स्थापन झालं (इ.स. ६५३-९७३). राजा पला(इ.स. ७५०-११६१) पूर्व भारतात (सध्याचे बंगाल आणि बिहार) राज्य करत होता.
This is NOT an official blog of HINDU RASHTRA SENA.but we are the prominent FOLLOWERS of VINAYAK DAMODAR SAWARKAR and LOKMANYA TILAK. we heartly welcomes you here on our blog.you can get information,news,posts about true history and culture of HINDU RASHTRA... " HAR HINDU KA SAPNA, AKHAND BHARAT HO APNA"
HAR HINDU KA SAPNA, AKHAND BHARAT HO APNA
सोमवार, २ मे, २०१६
⛳ हर्षवर्धन साम्राज्य ⛳
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा